Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी भाग जुनिअर कॉलेजच्या व्होकेशनल विभागात विविध गुणदर्शन व बारावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग जुनिअर कॉलेजच्या व्होकेशनल विभागात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.एस.पाटील होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, फिशपाँड, कोडे, संगीत खुर्ची आदी कार्यक्रम पार पडले.




व्होकेशनल विभाग प्रमुख व्ही. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य आर. एस. पाटील यांनी पुस्तकी ज्ञानाशिवाय जीवन यशस्वी करण्यासाठी चांगली कला जोपासावी असे विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी सौ. संगीता पोतदार, अविनाश कुराडे, रामदास रणदिवे, राजाभाऊ सासने, मनीषा गवाणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मयुरी शेरवी, कविता जारकोळी, राधिका चौगुले, सानिका जांबोणी, रेहान पाकजादे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास व्होकेशनल विभागाच्या बँकिंग, इलेक्ट्रिकल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी विभागातील तसेच इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते. चंद्रकांत भोसले यांनी आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.