गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कोषाध्यक्षपदी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक भीमराव पाटील तर कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ सुशांत मगदूम यांची निवड झाल्याबद्दल गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटनेमार्फत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती अपर्णा वाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
यावेळी कार्याध्यक्ष राजु भुईम्बर, संस्थापक अध्यक्ष श्रीपाद स्वामी, सचिव सचिन ओहरा, उपाध्यक्ष पुष्पा गुरव, खजिनदार शिवाजी मांगले, सुषमा पोवार, सुधा सावंत, रेखा मोहिते, संपदा बामणे, सोनल पाटील, लता गुरव, शिल्पा हेब्बाळे, शैलजा पाटील, महादेव भकरी, भीमापा वाळकी, सुभाष खोत, सुरज फुटाणे, प्रकाश माने, संतोष नलवडे, विष्णू बुगडीकट्टीकर, संतोष भोसले, राजकुमार कुंभार, दयानंद सावंत, शितल शिंदे, माधुरी कुंभार, विशाल पोटे, संगिता माळी, सुवर्णा पाटील, रेखाताई चव्हाण, भाऊसाहेब देसाई, स्वप्निल शिंदे, संजय मोरे यांच्यासह तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी तालुक्यातील सर्व ग्रंथालयांना जिल्हा ग्रंथालय संघाकडून दिनदर्शिका वाटप करण्यात आले.


