केएसए ग्रामीण फुटबॉल लीग : संयुक्त भिमनगरने ठेवले आव्हान कायम
सॉकर ट्रेनिंग सडनडेथवर पराभूत
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन (केएसए) मार्फत सुरु असलेल्या फुटबॉल लीगच्या दुस-या दिवशी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन 'अ' संघाने सडनडेथवर सॉकर ट्रेनिंगवर ३-२ असे नमवून दिमाखदार वाटचाल कायम ठेवली. दुस-या सामन्यात संयुक्त भिमनगरने नवोदित युनायटेड 'ब' संघाचा ४ गोलनी पराभव करून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. येथील शिवराज महाविद्यायालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या या गडहिंग्लज ग्रामीण लीगचे गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने संयोजन केले आहे.
पहिल्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेडला सॉकर ट्रेनिंगने सुरवातीपासून संथ खेळ करत बचावावर भर देत विजयासाठी झुंजविले. उत्तरार्धात युनायटेडने अधिक आक्रमक खेळ करून पाठोपाठ पाच कॉर्नर मिळवूनही अचुकते अभावी बरोबरीची कोंडी फोडता आली नाही. निर्धारीत वेळेत सामना ०-० बरोबरीत सुटल्याने पंचानी सामन्याचा निकाल ट्रायब्रेकरवर झाला. यात युनायटेडचा गोलरक्षक अमर गवळीने तीन फटके अडवून विजयाचा शिल्पकार ठरला. टायब्रेकरमध्येही २-२ असी कोंडी कायम राहिली. शेवटी सडनडेथमध्ये युनायटेडच्या विदयाधर धबालेने अचूक गोल केला तर सॉकरच्या संदिप घेवडेने चेंडू गोलखांबा बाहेर मारून संघाला पराभवाच्या खाईत झोपविले. युनायटेडच्या सुल्तान शेख, प्रसाद पोवार तर सॉकरच्या आदर्श जाधव, प्रदिप देवार्डेने गोल मारल्याने युनायटेड सडनडेथमध्ये ३-२ असा नशिबवान ठरला. सॉकरच्या अक्षय सावंतने पेनल्टीचे दोन फटके अडवूनही पराजय टाळता आला नाही.
दुस-या सामन्यात नवोदित गडहिंग्लज युनायटेड 'ब' संघाने चिवट खेळ करून पुर्वार्धात संयुक्त भिमनगरला गोल मारण्यापासून रोखत लक्षवेधी कामगिरी केली. उत्तरार्धात युनायटेडचा गोलरक्षक तौसिन बोजगर जखमी झाल्याने भिमनगरला संधी मिळाली.भिमनगरच्या अक्षय होडगेने ४५ व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाला आत्मविश्वास मिळवून दिला. त्यानंतर गोलक्षेत्रात खेळाडूला अवैधरित्या रोखल्याने मिळालेल्या पेनल्टीवर प्रशांत सलवादने गोल करून आघाडी २-० अशी वाढवली. सामना संपताना प्रशांत सलवादेने ६८, ७० व्या मिनिटाला सलग दोन गोल करत स्पर्धेतील पहिली हैटट्रिक साजरी केली. युनायटेडच्या अनुभवी तानाजी देवकेरने चांगली लढत दिली.
उद्याचे सामने
१) गडहिंग्लज युनायटेड अ वि. युनायटेड ब सकाळी ७.०० वा.
२) काळभैरी फुटबॉल क्लब वि. संयुक्त भिमनगर क्लब. ८.३० वा.




