सिने अभिनेते अरुण पाटील प्रस्तुत 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामपंचायत व प्रेरणा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिध): तालुक्यातील हेब्बाळ-जलद्याळ येथे ग्रामपंचायत व प्रेरणा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच सौ. श्रध्दा श्रीकांत नलवडे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातील ज्येष्ठ व कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा पार पडला.
यानिमित्त पहिल्या सत्रात गावातील जेष्ठ 81 महिलांचा व 45 कर्तबगार महिलांचा नऊवारी साडी व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रायोजक "डिडवाणी(रतनलाल) चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व भावेश्वरी ट्रस्ट कोल्हापूर हे होत. दुपारच्या सत्रात सिने अभिनेते अरुण पाटील प्रस्तुत 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम घेण्यात आला. विविध दहा खेळांचा या उपक्रमात सहभाग घेण्यात आला. अरुणा करंबळकर या प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी तर सरिता दळवी व अर्चना रेडेकर या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले. विजेत्यांना स्टील भांडी संच बक्षीस व सूत्रसंचालन मानधन सुभाष रेडकर यांनी दिले.
स्पर्धेत सहभागी 74 महिलांना संजय पाटील यांच्याकडून भेटवस्तु देण्यात आली. अल्पोपाहार सुहास दळवी यांच्याकडून, बैठक, मंडप मारुती गावडे, पुष्पगुच्छ वैयक्तिक बक्षीस अबोली चव्हाण, कार्यक्रम अँकर मानधन निलेश नाईक यांच्याकडून देण्यात आले. अरुण पाटील यांनी होममिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच श्रद्धा श्रीकांत नलवडे, उपसरपंच अजित कुरळे, दिग्विजय गुरव, कविता चव्हाण, सुरेखा नाईक, नारायण कोकितकर यांच्यासह आशा पाटील, सुरेखा मनवाडकर, सुषमा बामणे, रेश्मा करंबळकर,शोभा पाटील,शीला सुतार यांचे मोलाचे योगदान लाभले.





