Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या न्यू वूमन्स फार्मसीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात

विद्यार्थिनींसाठी फेस योगा कार्यशाळेचे आयोजन





कोल्हापूर : येथील श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस,संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थिनींसाठी 'फेस योगा' या विषयांवर कार्यशाळा संपन्न झाली.




कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  स्लिमपॉसिबल च्या संचालक  व योगशिक्षिका रशिदा मकानदार उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य. डॉ. रवींद्र कुंभार यांनी सर्व विद्यार्थीनी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे रशिदा मकानदार यांनी उपस्थितांना योगाचा परिचय करून दिला व रोजच्या दिनचर्ये मध्ये योगाचे महत्त्व व त्यामुळे होणारा फायदा याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर फेस योगा यावर कार्यशाळा संपन्न झाली.



यावेळी पूजा पाटील, प्राध्यापक वृंद,  शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.रुचा अष्टेकर यांनी परिश्रम घेतले.आभार व सूत्रसंचालन प्रा.निकिता शेटे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.