Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजी-माजी सैनिकांच्या विविध अडचणीसंदर्भात १७ मार्च रोजी गडहिंग्लज येथे बैठक होणार

तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडून तातडीने दखल 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित गडहिंग्लज येथील जय जवान जय किसान फाऊंडेशनच्या वतीने आजी-माजी सैनिकांच्या महसूलविषयक अडचणी संदर्भातील तक्रार अर्जांबाबत तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना देण्यात आले. दरम्यान, याबाबत  १७ मार्च रोजी गडहिंग्लज येथील महसूल भवनमध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सकाळी ११ वा. बैठक बोलवण्याचे व तसे लेखी पत्र काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.



एखाद्या जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर काही कारणास्तव डायरी नोंद न होणे, पाणंद-वहिवाट रस्ते यासंदर्भात इतरांकडून होणारा त्रास, सिलिंगमध्ये माजी सैनिकास मिळालेल्या भूखंडावर अतिक्रमण आदी विषयांवर तहसील कार्यालयात वेळोवेळी लेखी तक्रार नोंदवून देखील या विषयावर समाधानकारक न्यायनिवाडा होत नसल्याच्या तक्रारी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने याकडे लक्ष वेधण्यात आले.  


दरम्यान, कौलगे येथील माजी सैनिक सखाराम डोंगरे यांनी पाणंद रस्ता खुला करण्याबाबत दिलेल्या अर्जावर तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी तातडीने कार्यवाही करत २४ मार्च पर्यंत सदर पाणंद रस्ता खुला करण्यासंदर्भात तलाठी व सर्कल यांना फोनवरून सूचना दिल्या.


यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, सचिव रामकृष्ण शेंडे, सुबराव पाटील, शिवाजी भोसले, धनाजी चव्हाण, श्रीपती कडूकर, जयवंत नगरे, सुभाष इंगळे यांच्यासह आजी-माजी सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.