Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुक्ती संघर्ष समितीच्या प्रयत्नाला यश ; भारत नगरमधील समस्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा

आजऱ्यात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक




आजरा : येथील भारत नगर मधील विविध समस्या संदर्भात मुक्ती संघर्ष समितीने वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून या समस्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान त्यांच्या या प्रयत्नाला प्राथमिक यश आले असून आजरा येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीला आजरा नगर पंचायत, वीज  तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने ही बैठक पार पडली.



यावेळी भारत नगरमधील विविध समस्या, पायाभूत सुविधा तसेच विजकनेक्शनसाठी फिडर, पथदिवे बसविण्यासंदर्भात चर्चा झाली. भारतीय संविधानाच्या कलम 243Wमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल सांगितले आहे. या कलमाद्वारे नगर पंचायतीना स्थानिक पातळीवार विविध सेवांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. ज्यात सांडपाणी, कलम 252(2)मध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणे बांधील आहे. परंतु गेली 27वर्षे भारत नगर वसाहत या सर्व सुविधापासून वंचित आहे. यासाठी मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या क्रमप्राप्त साखळीने संघर्ष सुरु केला आहे. याअगोदर निवेदने देण्यात आली. कोणतीही हालचाल न झाल्यामुळे "संघर्ष मोर्चा "काढण्याचे नियोजन होते परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत "संघर्ष मोर्चा "रद्द करून पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा सत्राची बैठक नगरपंचायत सभागृहात घेण्यात आली.



या चर्चेमध्ये मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी प्रश्नांचा भडीमार करीत भांबेरी उडवली. ते म्हणाले की, राजकारण महत्वाचे पण लोकांचे जीवनमान महत्वाचे नाही असं वाटतंय. आजऱ्यातील अशा आठ गटारी आहेत ज्या गटारीतून पाणी निचरा होणार नाही. त्यामुळे जो हेतू आहे ते साध्य होत नसेल तर काम करून फायदा काय? गटर आधी कि रस्ता आधी? असाही प्रश्न विचारला. ठेकेदाराकडून व्यवस्थित व चांगल्या दर्जाचे काम करून घेण्याबाबत तसेच भारत नगरमधील स्थळ पाहणी करण्याची आग्रही मागणी केली. यावर तातडीने स्थळ पाहणी करून प्रश्न सोडवण्यासाठीची हमी सर्व अधिकाऱ्यांनी दिली.



नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी राकेश चौगले, पाटबंधारे विभागचे सहा. अभियंता ए. एस. कचरे, कनिष्ठ अभियंता पी. बी. सुर्वे, वीज विभागचे अभियंता निखिल मोगरे, पोलीस कर्मचारी तसेच मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते दिंगबर विटेकरी, भारतनगरमधील तौफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, मकसूद माणगावकर, खुदबूद्दीन तगारे, गुलाब शिकलगार,पापा लतीफ,सलीम नाईकवडे, आसिफ मुजावर, मुदस्सर इंचनाळकर, अब्दुलवाहिद सोनेखान,  सलीम शेख, यासीन सय्यद, नईम नाईकवडे, शौकत पठाण, आसिफ मुराद,सलीम ढालाईत, रहुफ नसरदी, सल्लाउद्दीन नसरदी,मोईन शेख,मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर, कासिम लतीफ,  मोहम्मद नसरदी,फहीम नसरदी, रहीम लतीफ, रशीद लाडजी,मुफीद काकतीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.