Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना ज्युनिअर कॉलेजच्या व्होकेशनल विभागाचे संजय नाईक यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार



गडहिंग्लज  (प्रतिनिधी) : येथील साधना ज्युनिअर कॉलेज व्होकेशनल विभागाचे संजय नाईक 3 मार्च रोजी 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम साधना शिक्षण संस्था कॅम्पस, शेंद्री रोड येथे झाला.



व्होकेशनल (बिल्डिंग मेंटेनन्स कंट्रक्शन टेक्नॉलॉजी)च्या माजी विद्यार्थ्यांनी गौरव समिती स्थापन करून तसेच साधना शिक्षण संस्था, आर्किटेक इंजिनियर्स असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार कार्यक्रम झाला. गौरव समितीचे प्रमुख इंजिनिअर अजित उत्तुरकर यांनी स्वागत केले. संस्था संस्थापक  सचिव जे. बी. बारदेस्कर यांनी श्री. नाईक यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा  घेतला.



संस्थेचे अध्यक्ष चंदूभाई गुजर यांनी श्री. नाईक यांनी इंजिनिअर आणि शिक्षक म्हणून केलेल्या कामाचा गौरव केला  कागलचे नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी शुभेच्छा देत नाईक यांच्या शालेय आठवणींना उजाळा दिला.




संस्थेचे संचालक अरविंद बारदेस्कर यांनी संस्था विकास, बांधकामे, संस्थेसाठी योगदान याची माहिती सांगून संस्थेमार्फत श्री. नाईक यांना इस्टेट मॅनेजर' या पदावर नेमले आहे असे सांगितले. व्होकेशनल   महासचिव श्री.उतेकर  यांनी 2015 मध्ये  महाराष्ट्र शासनाचा व्होकेशनल  एज्युकेशन डिपार्टमेंटचा आदर्श शिक्षक पुरस्कार नाईक यांना मिळाला याबद्दल त्यांनी गौरव केला.  



यावेळी सुनीता नाईक, अनिकेत नाईक यांच्यासह इतर मान्यवरांनी श्री. नाईक यांना शुभेच्छा दिल्या. श्री. नाईक यांनी सत्काराबद्दल भारावल्याचे सांगून संस्थेत  विकासाची कामे यापुढे करू असे सांगितले. साधना शिक्षण संस्था माजी विद्यार्थी गौरव समिती, आर्किटेक इंजिनियर्स असोसिएशन, जे. बी. बारदेस्कर यांच्यामार्फत श्री. नाईक यांचा  व इतर मान्यवरांचा  सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन इंजिनिअर अजित उत्तुरकर, कृष्णात घोरपडे, धनंजय कल्याणकर, उदय काटकर यांनी केले. आभार शिवाजी गोरुले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.