Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काळू मास्तर, शिवराज विद्यालयाची विजयी सलामी

टिसीजी- युनायटेड ब्लू कब फुटबॉल लीग 


साधना- शिवाजी विद्यायालय बरोबरीत


गडहिंग्लज: युनायटेड टिसीजी ब्लू कब फुटबॉल लीगचे फुटबॉलला किक मारून उदघाटन करताना प्रा. प्रमोद इंचनाळकर. सोबत ए. बी. पाटील, महादेव पाटील, संजय पाटील आदी.


गडहिंग्लज (प्रतिनिध) : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टँलेन्ट कन्सोल ग्लोबल फौंडेशनमार्फत (टिसीजी) सुरु झालेल्या ब्लू कब फुटबॉल लीगमध्ये बारा वर्षाखालील गटात काळू मास्तर विद्यालय, शिवराज विद्यालयाने विजयी सलामी दिली. साधना हायस्कूल विरूध्द शिवाजी विद्यालय सामना १-१ असा बरोबरीत सुटला. येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर हि स्पर्धा सुरू आहे.



टिसीजी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इंचनाळकर यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उदघाटन केले. सौरभ जाधव यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. जेष्ठ खेळाडू महादेव पाटील अध्यक्षस्थानी होते. संजय पाटील, ए. बी. पाटील यांच्यासह संघव्यवस्थापक, खेळाडू आणि पालक उपस्थित होते. समन्वयक दत्ता चव्हाण यांनी आभार मानले. शिवराज स्कुलने पहिल्या सामन्यात नवोदित एम. आर. हायस्कुलचा ३-० असा पराभव केला.  शिवराजच्या मनी त्रिवेदी, अँरोन बार्देस्कर,सनी त्रिवेदी यांनी गोल मारले.




चुरशीच्या सामन्यात काळू मास्तर विद्यालयाने एम. आर. हायस्कूलला एका गोलने नमविले. काळू मास्तरच्या  आयन पटेलने महत्वपुर्ण गोल नोंदवला. साधना हायस्कूल विरूध्द शिवाजी विदयालय हा रंगतदार सामना १-१ असा बरोबरीत सुटला. साधनाच्या आयन मुल्लाने पहिला गोल मारला. उत्तरार्धात शिवाजीच्या श्रीराम सरदेसाईने गोल करून सामना बरोबरीत आणला. सुरज कोंडूस्कर, श्रवण पाटील, ओमकार घुगरी, आर्दश दळवीने पंच म्हणून काम पाहिले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.