Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चाफवडे येथील हायस्कुलच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळा संपन्न

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम





आजरा : आण्णा भाऊ यांचे वटवृक्ष बनलेले जनता शिक्षण संस्था, आजरा संचलित चाफवडे येथील हायस्कुलच्या नूतन इमारतीचा उदघाट्न सोहळा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आण्णा भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चाराटी होते.




आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात  शिक्षणाची गंगा आणणारे आण्णा भाऊ यांनी जनता शिक्षण संस्थेची स्थापना करून सर्व शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून दिले. चाफवडे येथील हायस्कुलच्या नूतन इमारतीचे उदघाटन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, आण्णा भाऊंच्या पश्चात अशोकआण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शैक्षणिक कार्य अतिशय उत्तम आणि योग्य पद्धतीने पुढे सुरु ठेवले आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना माध्यमिक शिक्षणाची सोय या चाफवडे हायस्कुलमुळे होत आहे. या शाळांमधून तयार होणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे जाऊन विकासाला हातभार लावण्यास कारणीभूत ठरतात. ग्रामीण भागातही चांगले आणि होतकरू विद्यार्थी घडवण्याचे काम या मंडळींनी योग्य प्रकारे सुरु ठेवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



यावेळी अशोकआण्णा, विलास नाईक यांच्यासह इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. त्याचबरोबर संस्था प्रमुख अशोकआण्णा चराटी यांच्या हस्ते आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.



यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, उपाध्यक्ष विलास नाईक, सचिव रमेश कुरुणकर, डॉ. दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, मनोहर पवार, युवा नेता अनिकेत चराटी, नुरजहाँ सोलापुरे, दशरथ अमृते, अभिजित जालकर, आबासो मोहिते, येसणे के व्ही यांच्यासह चाफवडे, चितळे भागातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजना कांबळे यांनी तर स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुनीता मुरुकटे यांनी केले. आभार प्रवीण कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.