Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुका पूर्व भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांचे प्रतिपादन 


नंदनवाड येथे अंगणवाडी इमारतीचे उदघाटन             





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभा मतदार संघात मोठ्या कंपन्या आणून गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून देऊ.  पूर्व भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले.



नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथे अंगणवाडी उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शेवंता मगदूम होत्या.  माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रेखाताई हत्तरकी यांच्या जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या अंगणवाडी क्रमांक १५६ व २६० या इमारतीचे उदघान आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.



यावेळी महाबळेश्वर कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी  शिवशंकर उर्फ अप्पी हत्तरकी, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष तेली, गडहिंग्लज तालुका सरचिटणीस अविनाश दुध्यागोळ, उपसरपंच तायगोंडा बोगरनाळ, उद्योजक सुमित संगाज, पर्यवेक्षिका भारती नंदयाई, गीता माजगांवकर, आर. बी. भोसले, बसवराज कंकणवाडे, उमेश इंगळे, चंद्रशेखर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम सावेकर, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक इस्माईल कादरभाई यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी केले. भीमराव मनगुते यांनी आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.