Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सीईटी सराव परीक्षेचा लाभ गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा!

युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांचे आवाहन  


दिनांक २९ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन ; या विभागासाठी गडहिंग्लज व नरतवडे येथे परीक्षा केंद्र 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): बारावी विज्ञान शाखा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधीज्ञ व इतर क्षेत्रात करिअर करण्यासाठी महत्त्वाची मानली जाणाऱ्या नीट व सीईटी परीक्षा पूर्व तयारीसाठी ठाकरे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावतीने व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार दिनांक २९ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यात युवा सेनेचे विभागीय सचिव अविनाश बलकवडे व युवासेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. या विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख ( ग्रामीण) अवधूत पाटील यांनी केले आहे.



गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल या चार तालुक्यांसाठी गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूल तर राधानगरी व भुदरगड तालुक्यांसाठी नरतवडे येथील शिवतेज शिक्षण प्रसारक मंडळ, नरतवडे हायस्कूल येथे ही सराव परीक्षा पार पडणार आहे. ही परीक्षा मोफत असून युवा सेनेने दिलेल्या  https://yuvasenacet.com/ या  लिंकवर ऑनलाइन अर्ज भरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करून या सराव परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांनी केले आहे.  


अधिक माहितीसाठी गडहिंग्लज : 9764521212/9067372525, चंदगड : 8999728500 / 8805239908, आजराः 9130471474/7506206274/9307614952, कागल: 9975489797,  राधानगरी : 9420009478/8055443851, भुदरगड : 9096406200 येथे संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.