गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी गडहिंग्लज येथील अविनाश आप्पासाहेब ताशिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. ताशिलदार यांच्या निस्वार्थी व उत्कृष्ट कामाची दखल घेऊन ही निवड केली गेली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पोवार यांनी दिले आहे.
या पदाच्या माध्यमातून प्रजासत्ताक देशाचे एक जबाबदार नागरिक या नात्याने लोकशाहीच्या संरक्षणार्थ व जनहितार्थ सत्यनिष्ठेने कार्य करून निस्वार्थीपणे समाजसेवेचे व्रत हाती घ्यावे व चळवळीचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोचवावे अशी अपेक्षा या नियुक्तपत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पोवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदामुळे आता माझ्यावरील जबाबदारी वाढले असून या पदाच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अविनाश ताशिलदार यांनी सांगितले.

