माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून १० लाखाचा निधी झाला होता मंजूर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील रस्त्यापासून ते नाईक मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार पाटील यांच्या माध्यमातून या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्यासाठी जनता दलाचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष बाळेश नाईक व बसर्गे ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला होता. तत्कालीन आमदार राजेश पाटील यांनी याची दखल घेत या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला होता.
यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, बसर्गेच्या सरपंच भारती रायमाने, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, पोलीस पाटील भागोजी कागीनकर, सुभाष नाईक, बसवराज पुजारी, विनायक गडकरी यांच्यासह ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.




