रवळनाथ कॉलनीतील युवकांचा आदर्शवत व स्तुत्य उपक्रम
आजरा (प्रतिनिधी): आजऱ्यामध्ये विविध ठिकाणी पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. होळी सणानिमित्त विविध मंडळाच्या मार्फत ठिकठिकाणी विविध पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
होळी साजरी करताना रवळनाथ कॉलनीत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करताना रवळनाथ कॉलनीतील युवकांनी समाजाला आदर्शवत मार्ग दाखवत आणि माणुसकी जपत होळीच्या नैवेद्यासाठी आणलेल्या पोळ्या तसेच इतर नैवेद्यरुपी खाद्य पदार्थ बाहेर गावाहून पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरीसाठी आलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना दान करण्यात आले.
हे युवक दरवर्षी दसरा, दीपावली, होळी या सणांच्या वेळी मागील दहा वर्षापासून असा उपक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण करीत आहेत. यांच्या या दातृत्वाचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
यावेळी आकाश पाटील, सुभाष कांबळे, आदेश दळवी, सतीश बामणे, अतुल पाटील आदी युवक उपस्थित होते. या उपक्रमाला परशुराम बामणे, अनिल पाटील व इतरांचे मार्गदर्शन लाभत असल्याबद्दल सांगण्यात आले.
पोलीस प्रशासनाचा शहरात चोख बंदोबस्त
शहरात स. पो. नी. नागेश यमगर यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याला वारंवार भेटी देत शहरात पोलीस संचलन केले जात आहे. सोबत गृहरक्षक दलाच्या जवानांनाही मदतीला घेतले जात आहे.



