सरकार पोल्ट्री सर्व्हिस,कोरीवडे तर्फे 'भरोसा' चालकांचा सत्कार
आजरा (प्रतिनिधी): आजऱ्यातील भरोसा चिकन सेंटर हे एक नावाजलेले आणि लौकिक प्राप्त केलेले चिकन दुकान आहे. सन 1980 पासून कार्यरत असलेले हे दुकान इस्माईल काकतीकर यांनी सुरु केले. आजऱ्यातील पहिलेच चिकन दुकान कदाचित. योग्य दर, स्वछता, सौजन्यशीलता आणि तत्पर सेवा या सर्व गुणामुळे भरोसा सर्वांचा भरोसा म्हणजे विश्वास जिंकण्यास यशस्वी ठरले.
इस्माईल काकतिकर यांच्या पाश्चात अल्ताफ काकतिकर आणि रमजान खेडेकर हे आता प्रभाविपणे आणि धडाक्यात दुकान चालवत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्याची शैली, योग्य व वाजवी चिकन दर, मार्केटिंग आणि ग्राहकांशी जुळलेली नाळ यामुळे त्यांनी आजऱ्यात वार्षिक सर्वात जास्त चिकनचा खप केल्याबद्दल सरकार पोल्ट्रीचे चालक धनाजी देसाई यांनी प्रा. नरेश भोई यांच्या हस्ते अल्ताफ आणि रमजान यांचा सत्कार केला. सरकार पोल्ट्री मागील सात वर्षांपासून योग्य, वेळेत दररोज सेवा देत आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. वार्षिक उलाढाल पहिली तर भरोसाने सर्वात जास्त खप केलेला आहे असे देसाई यांनी गौरवोदगार काढले.
याप्रसंगी श्रावण पाटील, साहिल पेडणेकर, हुजेफा बेपारी, मोहसीन बेपारी, आलम ढालाईत, मज्जो हिंग्लजकर आदिजण उपस्थित होते.



