Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'बिरेश्वर सोसायटी' हलकर्णी शाखेच्या चेअरमनपदी शिवकुमार संसुद्धी तर व्हा.चेअरमन पदी के. बी. पाटील

बुगडीकट्टीचे सरपंच दयानंद देसाई, अमोल पाटील, विजय लोहार, सुहास कुंभार शाखा सल्लागारपदी 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता.गडहिंग्लज) येथील श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी शाखा हलकर्णीच्या चेअरमनपदी शिवकुमार संसुद्धी तर व्हा.चेअरमनपदी के.बी.पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. शाखा सल्लागार म्हणून बुगडीकट्टीचे सरपंच दयानंद देसाई, अमोल पाटील, विजय लोहार, सुहास कुंभार यांची निवड झाली.



यावेळी संस्थापक व जोल्ले उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या जीवनावर आधारित "रिफॉर्मर"या लघुचित्रपट रिलीज कार्यक्रम पार पडले.



शाखाधिकारी बाहुबली पाटील यांनी निवडीचे पत्र दिले व संस्थेतर्फे सर्वांचे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी कलाप्पा गोटुरे, रवींद्र पाटोळे, विष्णू राजगोळे, बसवराज नावलगी, सतीश गोटूरे, संजय मुंगुरवाडी, इराप्पा मुंगुरवाडी,अनिल समई, विजय शिखरी, सतीश केसरकर, अजित स्वामी, अश्विनी नावलगी, सतीश येणेचंवडी आदींसह सभासद उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.