Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव येथे किशोरवयीन मुली व महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन

ग्रामपंचायत व गडहिंग्लज तालुका स्त्रीरोग संघटनेच्यावतीने  महिला मेळावा


तेराशेपेक्षा अधिक मुली व महिलांची उपस्थिती




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे ग्रामपंचायत महागाव आणि गडहिंग्लज तालुका स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने  भारतीय प्रसूती आणि स्त्रीरोग सोसायटीज फेडरेशन (FOGSI) अंतर्गत महिला आरोग्य मेळावा पार पडला. यामध्ये किशोरवयीन मुली व महिला यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन, सॅनिटरी पॅड व अंगणवाडी स्टेशनरी साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी तेराशेपेक्षा आधिक किशोरवयीन मुली व महिलांचा सहभाग होता.अध्यक्षस्थानी सरपंच प्रशांत शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्म बालविकास प्रकल्प अधिकारी बापूसाहेब शिनगारे उपस्थित होते.




यावेळी मार्गदर्शक म्हणून गडहिंग्लज तालुका स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ.सुरेश संकेश्वरी, डॉ.सुप्रिया रुद्रापगोळ, डॉ. गॉडद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.



कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक उपसरपंच संदीप कोकितकर यांनी केले. यावेळी डॉ.प्रतिभा चव्हाण यांनी किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या व उपाय, डॉ. गॉडद यांनी मासिक पाळीची अनियमितता, डॉ.सुरेश शंकेश्वरी यांनी स्तनाचा कॅन्सर, डॉ. सुप्रिया रुद्रापगोळ यांनी गर्भाशय मुखाचा कॅन्सर व एचपीव्ही लसीकरण, डॉ. गीता कोरे यांनी संतुलित आहार व व्यायाम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच बापूसाहेब शिनगारे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली.



या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून सॅनिटरी पॅड व अंगणवाडींना स्टेशनरी साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच ज्योत्स्ना पताडे, डॉ.श्वेता इंजन,अंगणवाडी पर्यवेक्षक शबनम मुजावर,ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, ग्रामपंचायत सदस्य परशुराम हुले, विकास इंगवले,अक्तर बागवान, वैशाली पाटील, समीना बागवान, गौराबाई निकम, नजीर बागवान, अर्जुन दिवटे, सुजाता शेवाळे, स्टेफी करवीनकोप्पा, मुख्याध्यापिका सुकेशनी कांबळे, सुवर्णा शेवाळे, मनाली स्मार्त यांच्यासह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिला, विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी तर आभार सुरज आसवले यांनी मानले. यावेळी अंगणवाडीच्या वतीने विविध स्टॉलचे आयोजन केले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.