Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचे केवळ आश्वासनच, सरकार सत्तेवर येऊन देखील १५०० रुपयेच!

गडहिंग्लजला ठाकरे शिवसेना महिला आघाडीकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत वेधले लक्ष 


२१०० रुपये देण्याचे आश्वासन पाळण्याची मागणी 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येऊन देखील या आश्वासनाची पूर्तता अद्याप सरकारने केलेली नसल्याने महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे. सरकारने तातडीने थकीत व आश्वासनुसार २१०० रुपये महिलांना द्यावेत अशी मागणी गडहिंग्लज येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.



ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत सदर निधी पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. या आधारावरच सरकारची सत्ता देखील आली. एकवीसशे रुपयांचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात पंधराशे रुपयेच महिलांच्या खात्यांवर जमा होत असल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासनाने तातडीने एकवीसशे रुपये व थकीत रक्कम महिलांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे.



यावेळी शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला संघटिका शांताताई जाधव, माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, तालुकाप्रमुख ॲड. स्नेहल पाटील, शहर प्रमुख स्वरूपा पेंडुरकर, मधुरा कांबळे, मेरी डिसोझा, मंगल जाधव, रूपाली देसाई, रोहिणी भंडारे, रेखा सुतार, शालन कासारीकर, वंदना कोळी, सुषमा कासारीकर, वैशाली घोटणे, अश्विनी भोसले यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.