गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याची फिर्याद राहुल पुणाप्पा व्हंजी (रा. हिटणी, वय ३३) यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज येथे संकेश्वर रोडवर मुथूट फायनान्सच्या समोर राहुल यांनी आपली स्कुटी लावली होती. या डिक्कीच्या आतमध्ये त्यांनी कॅरीबॅगमध्ये गुंडाळून दोन लाख रुपये रोकड ठेवली होती. त्यांनी डिकी उघडून पाहिले असता यामधील रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबतची फिर्याद पोलिसात दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

