Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यातील आजी - माजी सैनिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी 2 मे पूर्वी अर्ज करा

6 मे रोजी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक




कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजी, माजी सैनिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 मे 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आजी, माजी सैनिकांनी सर्वसामान्य माजी सैनिक, वीरपत्नी, अवलंबित यांच्या सामुहिक हिताच्या किंवा सर्वांसाठी सुविधा मिळावी यासाठी येणा-या अडी-अडचणींबाबत योग्य त्या तक्रारी असतील त्यांनी त्यांच्या कागदपत्रासहीत जिल्हा सैनिक कार्यालय, कोल्हापूर येथे दिनांक 2 मे 2025 पुर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (डॉ.) भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.