तहसीलदार समीर माने यांच्या उपस्थितीत सरपंच आरक्षण सोडत
आजरा (हसन तकीलदार ): आजरा तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. 23 ठिकाणी सर्वसाधारण सरपंच तर 37 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे. आजऱ्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली.
आजरा तालुक्यातील सरपंच सोडत काढताना सर्वप्रथम तहसीलदार समीर माने यांनी आरक्षण सोडत प्रक्रियेची तपशीलवार माहिती दिली. आणि त्यानुसार तालुक्यातील एकूण 73 ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण काढण्यात आले. यामध्ये चार जागा अनुसूचित जाती करिता, चार जागा अनुसूचित जाती महिला साठी, नऊ जागा मागास प्रवर्गाकरिता, दहा जागा महिला मागास प्रवर्गासाठी आरक्षित करताना शौर्य आजगेकर, विहान ढवळ, श्रीशा साठे, राही थोरवत, प्रतीक कोलते या शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
सन 2025 ते 2030 या कालावधीकरिता आजरा तालुक्यातील सरपंच आरक्षण खालील प्रमाणे राहिल....
1)अनुसूचित जाती :-देऊळवाडी, होन्याळी, सुळे, मडिलगे
2)अनुसूचित जाती (महिला ):-हरपवडे, हजगोळी खुर्द, उत्तूर, मेंढोली
3)मागास प्रवर्ग :-धामणे, पेंढारवाडी, होनेवाडी, चितळे, भादवण, महागोंड, मुमेवाडी, वडक्षिवाले, हजगोळी बुद्रुक
4)मागास प्रवर्ग (महिला ):-किटवडे, चिमणे, पेद्रेवादी, निंगुडगे, बेलेवाडी हूll, साळगाव, हाळोली, कोळींद्रे, भादवणवाडी, सुलगाव,
5)सर्वसाधारण :-खोराटवाडी, मलिग्रे, चव्हाणवाडी, जाधेवाडी, गवसे, एरंडोळ, हात्तीवडे,किणे, कासार कांडगाव, लाकूडवाडी, सरंबळवाडी, वझरे, पारपोली, कानोली, पोळगाव, सोहाळे, इटे, चांदेवाडी, बुरुडे, आर्दाळ, खानापूर, पेरणोली, बहिरेवाडी
6)सर्वसाधारण (महिला ):-सरोळी, सिरसंगी, हालेवाडी, देवर्डे, कोवाडे, वाटंगी, मुरुडे, देवकांडगाव, कोरीवडे, लाटगाव, दाभील, सुळेरान, आवंडी, शेळप, मासेवाडी, शृंगारवाडी, गाजरगाव, चाफवडे, करपेवाडी दुमाला, झुलपेवाडी, वेळवट्टी, मसोली, खेडे.
यावेळी उदयराज पवार, एम. के. देसाई, दिगंबर देसाई, अनिल फडके, राजू मुरुकटे, राजू होलम, रणजीत सरदेसाई, संभाजी सरदेसाई, दशरथ अमृते,, संजय पाटील, अविनाश हेब्बाळकर, उत्तम रेडेकर, संदीप चौगुले, मसणू सुतार,, विलास पाटील यांच्यासह सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी आभार मानले.


