८९ गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी जाहीर केले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १०, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २४ तर सर्वसाधारणसाठी ५४ ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. तालुक्यातील एकूण ४५ गावांमध्ये महिलाराज असणार आहे. येथील बचत भवन येथे हे आरक्षण सोडत काढण्यात आले.
सरपंच पदाचे आरक्षण गावनिहाय पुढीलप्रमाणे -
अनुसूचित जाती स्त्री
मनवाड, चिंचेवाडी, करंबळी, हिरलगे, हेब्बाळ जलद्याळ.
अनुसूचित जाती सर्वसाधारण
ऐनापूर, सांबरे, चन्नेकुप्प्पी, वाघराळी, दुगूनवाडी
अनुसिचीत जमाती स्त्री
कडलगे
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
बेकनाळ, हिडदुग्गी, हसूरसासगिरी, कवळीकट्टी, तळेवाडी, लिंगनूर कसबा नेसरी, खणदाळ, हेब्बाळ कसबा नूल, जरळी, बसर्गे बुद्रुक, हडलगे, वडरगे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
गिजवणे, भडगाव, महागाव, नेसरी, कुंबळहाळ, तावरेवाडी, मुत्नाळ, कडगाव, सरोळी, काळमवाडी, नूल, इदरगुच्ची.
सर्वसाधारण स्त्री
शिप्पूर तर्फ नेसरी, मुगळी, खमलेहट्टी, कौलगे, हरळी खुर्द, कडाल, वैरागवाडी, बटकनंगले, बिद्रेवाडी, डोणेवाडी, औरनाळ, सावतवाडी तर्फ नेसरी, तेगिननहाळ, तेरणी, बेळगुंदी, बुगडीकट्टी, हूनगिनहाळ, इंचनाळ, माद्याळ, नरेवाडी, नौकुड, शेंद्री, शिप्पूर तर्फ आजरा, बड्याचीवाडी, निलजी अत्याळ, तनवडी.
सर्वसाधारण
हिटणी, जखेवाडी, कुमरी, तारेवाडी, हसूरवाडी, यमेहट्टी, येणेचवंडी, हणमंतवाडी, नांगनूर, अर्जुनवाडी, उंबरवाडी, तुपूरवाडी, नंदनवाड, मुंगुरवाडी, मासेवाडी, मांगनूर तर्फ सावतवाडी, लिंगनूर कसबा नूल, कानडेवाडी, जांभूळवाडी, हरळी बुद्रुक, हनिमनाळ, हलकर्णी, दुंडगे, चंदनकुड, शिंदेवाडी, अरळगुंडी, हसूरचंपू.



