Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवभक्तांसाठी सोनियाचा दिवस उजाडला... संपूर्ण आजरा झाला शिवमय

आजऱ्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण




आजरा (हसन तकीलदार ) : सलग तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये काल सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात, उत्साहात पार पडला. ज्याची सर्वांना उत्सुकता होती तो कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि आनंदात पार पडला. पुतळा सुशोभीकरण समितीने कार्क्रमाचे नेटके आणि सुयोग्य नियोजन केले होते. तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग नेत्रदीपक अतिषजी, अंगावर शहारे आणणारे शिवशाही पोवाडे मंचचे शिवशाहीर दिलीप सावंत आणि त्यांचे सहकारी, नाशिक ढोल ताशा पथक, कलश पूजन अशा कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल यामुळे आजऱ्यात दिवसभर उत्सहाचे वातावरण होते. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे होते.




स्वागत व प्रास्ताविक करताना विलास नाईक म्हणाले, 1967 साली मुंबईकर गिरणीकामगार यांनी वर्गणी काढून छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा तयार केला. कै. काशिनाथआण्णा चराटी, कै. बळीरामजी देसाई, कै. वसंतराव देसाई यांनी पुढाकार घेऊन या पुतळ्याचे नियोजन केले होते. परंतु 2017 साली गावसभा घेऊन कै. बाबुराव कुंभार यांचे अध्यक्षतेखाली किमिटी स्थापन करून चर्चा करण्यात आली. कमिटीने अनेक पुतळे बघितले परंतु शिवाजी विद्यापीठाच्या पुतळ्याप्रमाणे पुतळा करण्याचे ठरले. त्यात बेळगावचे मॉडेल पसंत केले. कोरोनासारख्या आपत्तीमुळे दोन वर्षे विलंब झाला आणि काही तांत्रिक अडचणीही आल्या. त्यामुळे या कामाला 7 वर्षे लागली. या पुतळ्याला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 50 लाखाचा निधी दिला.  खासदार मंडलिक यांनी 10 लाख, पुण्याचे गोवेकर यांनी विद्युत रोषणाईची व्यवस्था, त्याचप्रमाणे रवींद्र आपटे यांनी सुद्धा देणगी गोळा करण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेची जागा असल्याने आनंदा कुंभार आणि समीर देशपांडे यांनी पाठपुरावा केला तर यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मदत केली.

     


आम. शिवाजीराव पाटील, संताजी घोरपडे साखरचे चेअरमन नवीद मुश्रीफ, पद्मजा आपटे, समितीचे अध्यक्ष महादेव उर्फ बापू टोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व धर्मीय, सर्व पंथीय आणि सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते, महिला,युवक, युवती यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पूर्णकृती पुतळ्याचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला. 



सुरवातीला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा ही आजरा तालुक्याच्या जनतेची तपश्चर्या होती. छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होताना माझे भान हरपून गेले. भव्य दिव्य पुतळ्याचे सर्वांचे स्वप्न आज पूर्ण झाले. यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेत ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत आणि या अभूतपूर्व सोहळ्याचे उदघाटन करण्याचे भाग्य लाभले हेच माझ्या आयुष्याचे सार्थक आहे.



गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, वैचारिक बैठकीचा तालुका असलेल्या आजऱ्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य व आकर्षक पुतळा उभारला याचा विशेष आनंद होतोय. प्रत्येक वेळी मला अचानकपणे अध्यक्षपदाची सूत्रे हाती दिली जातात. आजपर्यंत माझा सहभाग झाला नाही परंतु मी आज माझ्यातर्फे छत्रपती शिवरायांना उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी छत्र देण्याची घोषणा केली. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, नविद मुश्रीफ यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. आमदार शिवाजीराव पाटील यांनी दहा लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले.डॉ. अशोक बाचूळकर यांनी अप्रतिम सूत्रसंचालन केले.




यावेळी मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, जयवंतराव शिंपी,  के. पी. पाटील, अंजनाताई रेडेकर, सुनील शिंत्रे, नागेश चौगुले, जोत्स्ना चराटी, सुनील शिंत्रे, तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी संजय ढमाळ, आलम नाईकवाडे, शौकत लाडजी, राजेंद्र सावंत, जनार्दन टोपले, परशुराम बामणे, सुधीरभाऊ कुंभार, दिवाकर नलवडे, विजय थोरवत, संजयभाऊ सावंत,अभिषेक शिंपी, नौशादभाई बुडडेखान,गौरव देशपांडे, शरीफ खेडेकर, संभाजी इंजल, मारुती मोरे, जितेंद्र शेलार, गौरव देशपांडे, ओंकार मद्याळकर, चंद्रकांत ठाकूर, महेश कुरुणकर, महिला, युवा तसेच सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार आनंदा कुंभार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.