Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन महाराज आयुर्वेद'च्या प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

गोव्यातील शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगल सुनील मोरबाळे यांना प्रतिष्ठेचा इंटिग्रेट सोशल वेल्फेअर चा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. साखळी (गोवा) येथील रवींद्र भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात अर्चना गुरव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आला.



डॉ. मोरबाळे या 25 वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देण्याचे काम करीत असून सध्या त्या प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. याबरोबरच सामाजिक क्षेत्रात त्या नेहमी अग्रेसर राहून कार्यरत असतात या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाला होता.या कार्यक्रमात डॉ. मोरबाळे व त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला.




यावेळी कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, कर्नाटक जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, गोवा बांधकाम विभागाचे अधिकारी प्रशांत नाईक, अजित कदम यासह सैन्य दलातील अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर, व विविध मठाचे मठाधीश उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.