Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबध्द : आमदार शिवाजीराव पाटील

गडहिंग्लज पंचायत समिती शिक्षण विभागाकडून 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' बक्षीस वितरण कार्यक्रम



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज तालुक्यासह संपूर्ण चंदगड विधानसभा मतदारसंघातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. सर्व शाळांनी आपल्याकडे कोणतीही कामे घेवून यावीत. शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या भौतिक गरजा असतील तर त्वरीत प्रस्ताव पाठवून द्यावा, ते मंजूर केले जाईल, अशी ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले.



'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' टप्पा क्रमांक 2 च्या गडहिंग्लज पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.  महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, बॅ. बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा सन 2024-25 यशस्वी विद्यार्थी व उत्कृष्ट व्हिडीओ निर्मिती यशस्वी शिक्षक असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटशिक्षण अधिकारी एन. बी. हालबागोळ यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले व तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. जयश्री तेली यांनी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय बाबींचा आढावा घेतला.



बेलबाग येथीलजडिये सिध्देश्वर बेलबाग मठाचे मठाधिश  महासिध्देश्वर स्वामीजी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे संस्काराची विद्यापीठे असून या शाळेतून संस्कारक्षम विद्यार्थी बाहेर पडून देशाची सेवा करत आहेत.



यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अ गट - विद्यामंदिर लिंगनूर का नुल- प्रथम,  कै. शंकरराव नाडगौंडे विद्यामंदिर बसर्गे बु- व्दितीय, विद्यामंदिर कुमरी - तृतीय. ब गट- वि.दि. शिंदे हायस्कूल गडहिंग्लज प्रथम, सावित्रीबाई फुले विद्यालय करबंळी - व्दितीय, साई इंटरनॅशनल स्कूल बडयाचीवाडी- तृतीय. या शाळांना धनादेश, प्रशस्तीपत्र व बुके देवून गौरविण्यात आले. तर प्रज्ञाशोध इ. 4 थी, इ. 7 वी परीक्षेतील गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व बुके देवून आणि उत्कृष्ट व्हिडीओ निर्मिती करणाऱ्या तालुक्यातील शिक्षकांचा शिल्ड व बुके देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.



यावेळी चंदगड तालुक्यातील नवनियुक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मारुती कोलुणकर व सौ. पुष्पावती दरेकर यांनी केले. आभार केंद्रप्रमुख सुरेश हुली यांनी मानले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व केंद्रप्रमुख, बी. आर. सी स्टाफ, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, विद्यार्थी उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.