Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा मुस्लिम समाजाच्या प्रेसिडेंट पदी निवड झाल्याबद्दल आलमभाई नाईकवाडे यांचा सत्कार

प्रा. अशोक बाचूळकर व मराठा महासंघाचे अध्यक्ष मारुती मोरे यांच्या हस्ते सन्मान





आजरा (हसन तकीलदार) : आजरा मुस्लिम समाजाच्या प्रेसिडेंट पदावर माजी उपगराध्यक्ष हाजी आलमभाई नाईकवाडे यांची निवड झाल्याबद्दल  प्रा. डॉ. अशोक बाचूळकर व मराठा महासंघाचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल व जुनिअर कॉलेज येथे सत्कार केला.

     



आलमभाई नाईकवाडे यांची प्रेसिडेंट पदी वर्णी लागताच त्यांनी कामकाजाची धुरा सांभाळत योग्य पद्धतीने कामकाजाची सुरवात केली आहे. मुस्लिम समाजातील जमीयते उलमा ए हिंद, मरकज कमिटी आजरा, सोनेखान परिवार, तकीलदार -बुडडेखान परिवार, वाडागल्ली, अमराई गल्ली तसेच इतर गल्लीतील ज्येष्ठ नागरिक व तरुण पिढी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

    


डॉ. प्रा. अशोक बाचूळकर व मराठा महासंघाचे अध्यक्ष मारुती मोरे यांच्या हस्ते सत्कार करताना प्रा. बाचूळकर म्हणाले की, आमच्या विद्यार्थ्याचा आज समाजाच्या प्रेसिडेंट पदी नियुक्ती झाली त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. त्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या कामाची पद्धत आणि हातोटी वेगळी आहे.




   

मराठा महासंघाचे अध्यक्ष मारुती मोरे म्हणाले, आलमभाईचे काम आम्ही ते उपनगराध्यक्ष असताना पाहिले आहे. त्यांच्या कामाच्या धडाक्याचा प्रत्यय आम्हाला आला आहे.  त्यामुळे या शाळेचे भविष्य उज्वल होईल यात शंका नाही.

    


सत्काराला उत्तर देताना आलमभाई म्हणाले, मला समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. दिलेली जबाबदारी व विश्वास सार्थ ठरवेन. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. नाम. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन हायस्कुल ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी-बारावी सायन्स साठीच्या प्रस्ताव सादर करण्यासाठीचे शिफारस पत्र घेतले आहे. त्याचबरोबर शाळेच्या बांधकाम व दुरुस्तीच्या निधीसाठी मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिफारस पत्र दिले आहे. शाळेत पाण्यासाठी बोअरवेलची खुदाई केली असून शाळेच्या नावलौकीकासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.




यावेळी प्र. मुख्याध्यापक सलीम शेख, खजिनदार अष्कर लष्करे, सचिव हुसेन दरवाजकर, नौशादभाई बुडडेखान, शरीफ खेडेकर आदिजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.