हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत उपक्रम
आजरा(हसन तकीलदार) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत सर्व बसस्थानकांची स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत परिवहन विभागाने दिलेल्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी आजरा बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवली.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व बसस्थानके स्वच्छ व नीटनेटके ठेऊन प्रवाशांना योग्य व चांगली सेवा देऊन "प्रवाशांच्या सेवेसाठी "हे परिवहन खात्याचे ब्रीद वाक्य सार्थ करण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत बसस्थानक स्वच्छ व नीटनेटके ठेऊन प्रवाशांच्या सेवेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार आजरा आगारातील कर्मचारी व अधिकारी यांनी हातात झाडू घेऊन कचरा साफ करून आवारातील गवत, रोपटे काढून बसस्थानकाचा परिसर स्वच्छ केला. आठवड्यातून दोनवेळा ही मोहीम राबवणार असल्याचे सांगण्यात आले.
आजरा बसस्थानक स्वच्छ व नीटनेटके ठेऊन प्रवाश्यांना चांगली सेवा देऊन आजरा बस स्थानकाचे नाव राज्यात व जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणणार असे विभाग नियंत्रक शिवराज जाधव व वाहतूक नियंत्रक आर. जी. येसादे यांनी सांगितले. या स्वछता मोहीमेमध्ये आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील, वर्कशॉप इन्चार्ज एन. एस. लट्टे, वाहतूक नियंत्रक आर. जी. येसादे, नितीन परीट, राहुल कांबळे, बाळू पांडव, मोहन लकांबळे, सदानंद पोटे अवदूत कोडोलीकर, विपुल पाटील, इस्माईल माणगावकर, टी. टी. शेवणे, प्रसाद जोशी, एल. एम. गवळी, पी. एम. कोरगावकर,संदीप खवरे, वाहतूक नियंत्रक सनीष भोगूलकर व डी. एम. अस्वले आदींनी भाग घेतला होता.


