हरळी खुर्द येथील जळीतग्रस्त शेतकऱ्याला केली आर्थिक मदत
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी खुर्द (ता.गडहिंग्लज) येथील शेतकरी तानाजी गोविंद पताडे यांच्या जनावरांच्या गोठ्याला रविवारी लागलेल्या आगीत गुदमरून एक गाभण म्हैस, एक दुभती म्हैस व रेडकू अशा तीन जनावरांचा मृत्यू झाला होत. आज आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित-जय जवान जय किसान फौंडेशन, गडहिंग्लज च्या वतीने सौ. रंजना तानाजी पताडे यांच्याकडे पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत इदरगुच्ची येथील आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त सुभेदार काडाप्पा देसाई यांनी दिली. यावेळी संघटनेने घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जळीतग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला.
यावेळी सचिव रामकृष्ण शेंडे, सल्लागार जयवंत नगरे, सुभाष गावडे,भरत येल्लुरे, सदस्य बाळु पोवार, उपसरपंच शशिकांत चौगुले, माजी सैनिक विठ्ठल पाटील, आजी-माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते.

