आयशर, फोर्ड व रिक्षा यांच्यात घडली दुर्घटना
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव बसस्टँड जवळ आज सायंकाळी साडेसातच्या दरम्यान आयशर, फोर्ड व रिक्षा यांच्यामध्ये तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाल्याचे वृत्त हाती आले असून या संदर्भात सविस्तर माहिती अद्याप प्राप्त व्हावयाची आहे. अपघातानंतर घटनास्थळी वाहनधारक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर आयशर व रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला व फोर्ड गाडी दुसऱ्या बाजूला अशी स्थिती होती. येणार जाणारे नागरिक या अपघाताबाबत माहिती घेत होते. अद्याप अपघाताचे कारण समजलेले नाही.



