गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीने महाराष्ट्रातील सरकारी दवाखान्यामध्ये अधिकाधिक शस्त्रक्रिया करणारे एकमेव डॉक्टर म्हणून डॉ. चंद्रकांत खोत यांचा महाराष्ट्रात गौरव होत आहे. त्यांनी शस्त्रक्रियेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गडहिंग्लज यांच्या वतीने चंदगड, आजरा, गडहिंग्लज व भुदरगडचे विभागीय अध्यक्ष शिवाजीराव गुरव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सी.पी. आरच्या शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांची प्रमुख उपस्थितीत होती. तसेच ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष तानाजीराव कुराडे, डॉ. महादेव ढोकरे-पाटील, सचिव अनिल कलकुटकी, महिला प्रतिनिधी रोहिणी चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकारी व उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कॉम्रेड शिवाजीराव गुरव म्हणाले, चांगल्या कामाची आम्ही नेहमीच दखल घेतो. त्यातूनच त्यांच्या उचित कार्याचा सत्कार व्हावा यासाठी हा विशेष सत्कार करण्यात आला. रुग्णांच्यासाठी तक्रार करणारे म्हणून आमच्याकडे पाहिले जाते. चांगल्या कार्याला आम्ही नेहमीच पाठिंबा देत असतो अशा डॉ.खोत यांच्या सारख्या चांगले कार्य करणाऱ्या स्टाफचेही त्यांनी कौतुक केले. आभार डॉ. महादेव ढोकरे पाटील यांनी मानले.

