Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथील आझाद दूध संस्थेच्या चेअरमनपदी दिलावर साबखान तर व्हाईस चेअरमनपदी दस्तगीर छडेदार

           दिलावर साबखान              दस्तगीर छडेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील आझाद सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या चेअरमन पदी दिलावर दस्तगीर साबखान तर व्हाईस चेअरमन पदी दस्तगीर राजेसो छडेदार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  आर. के. पाटील यांनी काम पाहिले. सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. 



संचालक मंडळामध्ये मौला अमुलाल देसाई, शब्बीर हसन साबखान, इमामहुसेन महंमद हुसेन जकाती, यासीन महेबुब मुल्ला, खातूजा इमाम नेसरी, आशाबी नबीसाब करीमगोळ यांचा समावेश आहे. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी संस्थेचा कारभार सर्व संचालक व सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शक करून सभासद हिताच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. 



या निवडी प्रसंगी लेखा परीक्षक विलास कुंभार, हिंदुराव खैरे यांच्यासह कर्मचारी व सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव राजू गंधनवाले यांनी केले. आभार मोसिम साबखान यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.