Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला रविवारपासून युनायटेडतर्फे मोफत फुटबॉल प्रशिक्षण



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि रावसाहेब कित्तुरकर विश्वस्त मंडळातर्फे उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिर होणार आहे. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर रविवारपासून (ता. २० ) पासून दहा दिवसांचे हे शिबिर होणार आहे. सहा ते सोळा वर्षाखालील मुलां मुलींसाठी हे शिबिर मोफत असणार आहे. रोजसायंकाळी पाच ते साडे सहा या वेळेत हे शिबिर आहे.




शिबिरात खेळाडूंसाठी विविध व्याख्यानेही होणार आहेत. शिबिराचे यंदाचे २६ वे वर्ष आहे.स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलची ओळख व्हावी या उद्देशाने गडहिंग्लज युनायटेडमार्फत दरवर्षी हे शिबिर घेतले जाते. अलीकडे मोबाईलमुळे विद्यार्थी मैदानापासून दुरावत आहेत. त्या विद्यार्थ्यांना फुटबॉलच्या माध्यमातून मैदानी खेळाची गोडी लागावी हाच शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. रोज सायंकाळच्या सत्रात हे शिबिर होईल. शिबिरात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) ‘डी लायन्स’ धारक पाच प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात फुटबॉलची विविध कौशल्ये शिकविली जाणार आहेत. विशेषतः गोलरक्षकासाठी खास मार्गदर्शन दिले जाईल.



शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंचा आहार, स्पोटर्स करियर, दुखापतीवरील उपचार या विषयावर खास तज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शिबिरातील प्रतिभावान होतकरू विद्यार्थ्यांना युनायटेड फुटबॉल स्कुलसाठी निवडले जाईल.  शिबिराच्या शेवटच्या ठप्प्यात सहभागी खेळाडूसाठी स्पर्धा होईल. उत्कृष्ट शिबिरार्थींना क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यातयेणार आहे. तरी या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी , उपाध्यक्ष सुरेश कोळकी आणि कित्तुरकरविश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संतोष कित्तूरकर यांनी केले आहे. शिबिर समन्वयक ओंकार घुगरी, सुरज कोंडूस्कर नियोजन करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.