Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जंगमहटी गावचे माजी सरपंच विष्णू गावडे यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन 


मुंबई: जंगमहटीचे माजी सरपंच विष्णू गावडे यांच्या हाती शिवबंधन बांधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. यावेळी उपस्थित संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर व इतर.


मुंबई : चंदगड तालुक्यातील जगंमहटी गावचे माजी सरपंच विष्णू गावडे यांनी नुकताच मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला. 



श्री. गावडे यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून गावाची धुरा यशस्वी सांभाळली आहे.  या काळात त्यांनी मराठी शाळा बांधकामासाठी दोन कोटी मंजूर करून आणली, गावातील अंतर्गत रस्ते, वीज, अंगणवाडी बांधकाम, दलित वस्तीच्या स्मशान भूमीचा रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला असून अनेक पाणंद रस्ते खुले करून दिले आहेत. पर्यावरणाला घातक असलेला गावात अनाधिकृत मंजूर केलेला बॉक्सईड उत्खनन प्रकल्प रद्द करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून रद्द केला, चंदगड तालुक्यातील घातक 'एव्हीएच'  सारखा विनाशकारी प्रकल्प हद्दपार करण्यासाठी लढा दिला आहे. दौलत कारखान्यात वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनात भाग घेऊन कामगारांना न्याय मिळवून दिला असून शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले मिळवून दिली आहेत. अशी अनेक विधायक कामे त्यांनी केली आहेत.



आता त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची मशाल हातात घेऊन इथून पुढच्या काळात पक्ष वाढीसाठी काम करून सर्व सामान्य माणसांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झटत राहणार असल्याचे सांगितले.


यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री. गावडे यांचे पक्षात स्वागत करून भविष्यात चंदगड विधानसभेमध्ये पक्ष वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीपराव माने, आजरा तालुका प्रमुख युवराज पवार, युवासेना जिल्हा प्रमुखअवधूत पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.