Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दभिलला सरपंच पद आरक्षणावर घेतला आक्षेप

आरक्षण थांबवून लवकरच कायदेशीर सुनावणी करावी :  संदीप कांबळे 





आजरा (हसन तकीलदार ): आजरा तालुक्यातील गावांच्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण मंगळवार दि. 8  रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये दाभील गावासाठी सर्वसाधारण महिलासाठी हे सरपंचपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत मागासवर्गीयसाठी पद मिळाले नसल्यासमुळे सरपंच पद मागासवर्गीयासाठी आरक्षित व्हावे अशी मागणी दाभील गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे यांनी तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.




मौजे दाभील ग्रामपंचायतीची स्थापना सन 1974 साली झालेली आहे. स्थापनेपासून ते आजतागायत या ग्रामपंचायतीला मागासवर्गीय पुरुष सरपंच पद आरक्षण मिळालेले नाही. सन 1974 ते 1997 पर्यंत आनंदराव सीताराम पाटील (खुला पुरुष वर्ग ), सन 1997 ते 2002 पांडुरंग भैरू झित्रे (इतर ओ बी सी ), सन 2002 ते 2007 तुळसाबाई तुकाराम कांबळे (एस. सी महिला), सन 2007 ते 2012 रामचंद्र सीताराम पाटील (खुला पुरुष वर्ग ), सन 2012 ते 2017 स्वाती श्रीपती पाटील (सर्वसाधारण महिला ओपन ), लोकनियुक्त 2017 ते 2022 अमृता दीपक गवळी (ओ बी सी. महिला ) 2022 युवराज दत्तू पाटील (खुला पुरुष वर्ग ) दि. 8/4/2025 रोजी झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये आतातरी मागासवर्गीय पुरुष आरक्षण मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा यावेळीही पूर्ण झालेली नाही. ग्रामपंचायत स्थापनेपासून आज अखेर मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला आहे त्यामुळे या आरक्षणावर आपली हरकत असल्याबद्दल सामाजिक कर्यकर्ते संदीप कांबळे यांनी तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांना दिले असून आपली हरकत नोंद करून घेऊन याची ताबडतोब सुनावणी घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.