Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले निडसोसी मठाचे मठाधिपती शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा सत्कार

राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केल्याबद्दल गौरव





गडहिंग्लज (प्रतिनिधी): जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी अपारंपारिक ऊर्जा आणि फलोत्पादन मंत्री, वारणा  उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, पन्हाळा-शाहूवाडी मतदार संघाचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी निडसोसी येथील श्री दुरदुंडेश्वर सिध्द संस्थान मठाचे मठाधिपती जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींना कर्नाटकच्या राणी कित्तूर चन्नम्मा युनिव्हर्सिटीकडून पीएचडी (मानद डॉक्टरेट) पदवी प्रदान करून गौरविल्याबद्दल मठाला भेट देत त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.



यावेळी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, देवदासी ह्या सामाजिक कुप्रथेच्या विरोधात जटा निर्मुलन आणि देवदासी पुनर्वसनाचे मोठे काम उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वामीजींनी करत समाज उद्धाराचे काम केले आहे.  निडसोशी मठ म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र असुन सामाजिक सेवेबरोबरच, मठाने फार मोठे शैक्षणिक कार्य केले. या योगदानाबद्दल स्वामीजींना मानद डॉक्टरेट सन्मान प्राप्त झाला. त्याबद्दल महाराजांचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळाले. यापुढेही महाराष्ट्र शासनाकडून लागेल ते सहकार्य आम्ही करु अशी ग्वाही त्यांनी दिली.



यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व गडहिंग्लजचे माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापुर, माजी नगरसेवक बाळासाहेब गुरव, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष बी.एन.पाटील, शहर अध्यक्ष बसवराज आजरी यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.