गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात अधिकाधिक मोठ्या शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केल्याबद्दल राज्य शासनातर्फे महाराष्ट्र आरोग्य सन्मान या पुरस्काराने डॉ. चंद्रकांत खोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याबद्दल ठाकरे शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, युवा सेना कोल्हापूर जिल्हा विस्तारक डॉ. सतीश नरसिंग, तालुका प्रमुख दिलीप माने , विभाग प्रमुख दिगंबर पाटील, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपशहर प्रमुख मनीष हावळ ,श्रीशैल साखरे, काशिनाथ हालसोडे, संजय पाटील, महेश भोसले, माजी तालुका प्रमुख विलास येमाटे, संकेत रावण, संभाजी येडूरकर ,तुकाराम वाघराळकर उपस्थित होते.

