Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलला उपविजेतेपद

बंगळुर येथील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा 


गोव्याकडून गडहिंग्लज पराजित ; आठ राज्यांचा सहभाग 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने सोळा वर्षाखालील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात गोव्याच्या साउथ युनायटेड संघाकडून 5-0 असा गडहिंग्लजला पराजय स्वीकारावा लागला. गेले तीन दिवस बंगळुर येथे ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत आठ राज्यातील 16 संघांचा सहभाग होता.



उपांत्य पूर्व फेरीत युनायटेड फुटबॉल स्कूलने केरळच्या फोर्सा अकॅडमीला 2-1 असे नमवून उपांत्य फेरी गाठली होती. सहाव्या मिनिटाला  युनायटेड स्कूलच्या कमरान आत्तारने उत्कृष्ट फटक्याद्वारे गोल करून खाते उघडले. पाठोपाठ  युनायटेडच्या सौरभ मकशीने गोल करून आघाडी 2-0 अशी वाढवली. यानंतर केरळने फ्री किक वर गोल करून 2-1 असा सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला.



उपांत्य फेरीत युनायटेड स्कूलने यजमान कर्नाटकच्या फ्रीडम अकॅडमीवर 3-0 अशी मात केली. हे तिन्ही गोल युनायटेड स्कूलच्या साई बनगे, समर्थ निकम, विश्वजीत बिलावर यांनी कॉर्नरवर हेडद्वारे  करून लक्ष वेधले. अंतिम सामन्यात गोव्याच्या साउथ युनायटेडने गडहिंग्लज स्कूलला 5-0 असे हरविले. अंतिम सामन्यानंतर फ्रीडम संस्थेच्या प्रमुख  अनिता केनिया, किक स्टार्ट फुटबॉल क्लब अध्यक्ष शेखर राजन, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू चिंटा चंद्रशेखर, श्री मॅट, सत्या क्रिस्टोपर यांच्या उपस्थितीत विजेत्यांना फ्रीडम करंडक, प्रशस्ती पत्र आणि क्रीडा साहित्य देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.