Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शासनाकडून गुरव समाजाला मदतीसाठी प्रयत्न करू!

शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांचे प्रतिपादन


मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल  गडहिंग्लज तालुका गुरव समाजाच्या वतीने स्वामीजींचा सत्कार 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गुरव समाजातील मुलांसाठी व  समाजासाठी शासनाकडून मदत मिळण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे आवाहन निडसोसी येथील शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. 



गडहिंग्लज तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने स्वामीजींना राणी कित्तूर चन्नम्मा युनिव्हर्सिटी मार्फत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केल्याबद्दल स्वामीजींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.निडसोशी मठात हा छोटेखानी पार पडला.




बाळासाहेब गुरव यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना स्वामीजी पुढे म्हणाले,  प्रत्येक गावागावात गुरव समाजातील गरीब व गरजू मुलांचा शोध घेऊन समाजामार्फत त्यांना शिक्षणासाठी हातभार लावावा. तसेच समाजातील मुला मुलींच्या विवाहासाठी समाज संघटनेकडून मदत करण्याचा प्रयत्न करावा. समाजासाठी शासनाकडून देखील मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आपण देखील सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.




यावेळी तालुकाध्यक्ष अनिल गुरव,  सचिव सातलिंग गुरव, निजगुनी स्वामी, बाळासाहेब गुरव (चिंचेवाडी), विक्रांत गुरव, अजित गुरव, रवी गुरव, चंद्रकांत गुरव, कुमार गुरव, गजानन गुरव, गोविंद गुरव, रमेश गुरव, प्रकाश गुरव, बाळासाहेब गुरव (शेंद्री), श्री. आडके यांच्यासह गडहिंग्लज तालुक्यातील गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.