गडहिंग्लज (प्रतिनिधी): आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चैतन्य अपंग व मतिमंद विद्यालय कडगाव व ब्लॉसम इंग्लिश स्कूल कडगाव येथे राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेतृत्व ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या मार्गदर्शनाने मुगळीचे सरपंच युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळे व मिठाई वाटप करण्यात आले.
प्रारंभी स्वागत चैतन्य अपंग व मतिमंद विद्यालयाचे प्राचार्य साताप्पा कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. संतोष पाटील यांनी केले. मल्लिकार्जुन आरबोळे,पौर्णिमा पाटील-कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अजित बंदी, डॉ. श्रद्धा पाटील, प्रा स्वप्निल आरदाळकर, संतोष पाटील, विजय गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ब्लॉसम इंग्लिश स्कुलचे प्रा. सयाजी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

