गडहिंग्लज (प्रतिनिधी): सर्वाधिक मोठ्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाचा शासनाच्या आरोग्य विभागाने सन्मान केल्याबद्दल न्यू युवा मंचच्या वतीने येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्त्री रोग तज्ञ जीवन पाटील, डॉ. स्वाती पाटील, अमर कांबळे, हेमामालिनी झेंडे, महादेवी डवरी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष काशिनाथ गडकरी, आरती कदम, श्रीदेवी गडकरी, लक्ष्मण पाछापुरे, सागर कांबळे, निकेतन चव्हाण, अभिजीत पाटील उपस्थित होते.

