Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज युनायटेड स्कुल बंगळूरला रवाना ; अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार

स्पर्धेत एकूण आठ राज्यांचा सहभाग


गडहिंग्लज : बंगळूर अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघासमवेत सतीश पाटील, अरविंद कित्तुरकर, महादेव पाटील, प्रशिक्षक दीपक कुपन्नावर आदी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलचा संघ आज सायंकाळी बंगळूरला रवाना झाला. सोळा वर्षाखालील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे.बुधवार (ता. २३) ते शुक्रवार अखेर होणा-या या स्पर्धेत गोवा, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, पॉडेचेरी,तेलगंणा आणि महाराष्ट्र राज्यातील सोळा संघ सहभागी आहेत. बंगळूर येथील किक स्टार्ट क्लबच्या कृत्रिम हिरवळीवर ही फ्रिडम ट्रॉफी  स्पर्धा खेळवली जाणार आहे.



कुमार आणि युवा  खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, अधिक सामने खेळायला मिळावेत म्हणून गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलच्या वतीने दरवर्षी संघ पाठविले जातात. खासकरून फुटबॉलमधील अव्वल समजल्या जाणा-या परराज्यातील केरळ, कर्नाटक येथील नामवंत स्पर्धांत संघ सहभागी होतो. तेरा, पंधरा, अठरा आणि एकवीस वर्षाखालील युनायटेड स्कूल अंतर्गत संघ कार्यरत आहेत. एकोणीस वर्षाखालील संघ दरवर्षी केरळला जातो. गतवर्षी या संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. बुधवारपासून लीग पध्दतीने स्पर्धेला प्रारंभ होईल.



सोळा संघाची प्रत्येकी चार याप्रमाणे चार गटात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या ठप्प्यात साखळी सामने होऊन प्रत्येक गटातील दोन गुणानुक्रमे अव्वल संघ उपात्यंपुर्व फेरीसाठी पात्र ठऱतील. शुक्रवारी सकाळी उपात्यं  तर सायंकाळी अंतिम सामना होणार आहे. गेले दहा दिवस या संघाचे एम. आऱ. हायस्कूलच्या मैदानावर सराव शिबिर झाले. गडहिंग्लज युनायटेडचे संचालक सतीश पाटील, मार्गदर्शक अरविंद कित्तुरकर, जेष्ठ खेळाडू महादेव पाटील यांनी  संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.




सहभागी संघ असा  


सश्रृत सासने (कर्णधार), सर्वेश मोरे (उपकर्णधार), सोजल कांबळे, रिहान अत्तार, समीर चौगुले, विश्वजीत बिलावर,वर्धन कांबळे, आदित्य लाखे, साई बनगे, सौरभ मकशी, अर्थव जाधव, युवराज बिलावर, समर्थ निकम, आलोक पाटील, धीरज कुरबेट्टी.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.