गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील खणदाळ येथील नामदेव मारुती चिरमुरे या तरुणाने सेवा सोसायटीमध्ये शिपाई पदापासून ते चेअरमन पदापर्यंत घेतलेली भरारी निश्चितच आदर्शवत आहे. नुकतेच नामदेव यांची श्री लक्ष्मी दूध संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.
नामदेव चिरमुरे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. शेतकरी कुटुंबात असून देखील त्यांनी दहा वर्षे या सेवा सोसायटीमध्ये शिपाई म्हणून नोकरी केली. त्यानंतर 2023 झालेल्या श्री लक्ष्मी दुध संस्थेच्या निवडणुकीत ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. आता 2025 मध्ये त्यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी हे यश अतिशय खडतर परिस्थितीत मिळवलेले आहे. श्री लक्ष्मी दूध संस्था कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. या संस्थेच्या चेअरमन पदी नामदेव चिरमुरे यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

