Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईत हणबर गवळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

समाज बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड  




मुंबई : मुंबई येथे हणबर गवळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक  हणबर गवळी समाजाचे कार्याध्यक्ष डॉ गंगाधर व्हसकोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अध्यक्षस्थानी चंद्रकांत खोत होते. यावेळी मुंबई येथील समाजाच्या विकास विविध समस्या सोडवण्यासाठी रामचंद्र येमेटकर व चंद्रकांत खोत यांची निवड करण्यात आली.



या पदाधिकाऱ्यांवर मुंबई शहरातील जातीची दाखले, समाज सभासदांना मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना मदत व संघटना मजबूत करणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. सुरुवातीला धनाजी तांबेकर यांनी प्रास्ताविक केले व काश्मीरमध्ये शहीद झालेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पावले उचलावेत अशी मागणी करण्यात आली. याबाबतचा ठराव देखील करण्यात आला. काश्मीर आपल्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणाही देण्यात आल्या. या बैठकीत हणबर गवळी समाजातील विविध प्रश्नांविषयी चर्चा झाली. हणबर गवळी समाजात एकीकरण  करण्यासाठी डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी समाजाला मार्गदर्शन केले. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत समाजबांधव उतरतील असा सूचनाही देण्यात आल्या. आभार  रामचंद्र येमेटकर यांनी मानले. मुंबईमध्ये गेल्यावर्षीचा संस्थेचा खर्च डॉ व्हसकोटी यांना दाखवण्यात आला व ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.



यावेळी शीलाताई कलगोंडा, अजित पाटील, राकेश पाटील,मारुती पाटील यांच्यासह हणबर गवळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.