Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात सोमवारी वारकरी संप्रदाय मेळाव्याचे आयोजन

वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे रामकृष्ण हरी वारकरी मंडळाचे आवाहन




आजरा (हसन तकीलदार ): सोमवार दि. 21 रोजी आजरा येथे वारकरी संप्रदायाच्या मेळाव्याचे आयोजन केले असून तालुक्यातील वारकरी मंडळींनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

        


श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी कॉ. संपत देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. सुरवातीला गौरोजी सुतार महाराज यांनी स्वागत आणि प्रास्तविक करून मेळावा का घेणार आहोत याची माहिती सांगितली. गेले वर्षभर आजरा तालुका वारकरी मंडळ तालुक्यात कार्यरत आहे. रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्था स्थापन केली असून या संस्थेची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी मेळावा होत आहे. तयारीसाठी तालुक्यातील सर्वच गावात वारकरी मंडळींच्या सभा बैठका झाल्या आहेत.

    


 हा मेळावा श्रमिक पतसंस्था सभागृहात  सोमवारी २१ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. सर्वांनी मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन राम कृष्ण हरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.