Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला भाजपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त गडहिंग्लज येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.




गडहिंग्लजचे उद्योजक दशरथ कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रा. रमेश करगांवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र तारळे तर स्वागत प्रितम कापसे यांनी केले. हा कार्यक्रम झाल्यानंतर प्रांत कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.



यावेळी अनिता चौगुले, आनंदी चव्हाण, निलांबरी भुईंबर, अनिता गुरव, डॉ. संतोष पेडणेकर, अनिल गायकवाड, सचिन घुगरी, सतिश हळदकर, अमित देशपांडे, सुभाष चोथे, सागर गुरव, विक्रम पवार, वामन बिलावर, बाळ पोटे-पाटील, भाऊसोो मोरे, महादेव खमलेट्टी, अर्जुन सावेकर, सुधाकर गोरूले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.