गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांनी एका वर्षात ६७६ शस्त्रक्रीय यशस्वीरित्या केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. याबद्दल डॉ. खोत व त्यांच्या टीमचे गडहिंग्लज भाजप परिवारामार्फत उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रितम कापसे, राजेंद्र तारळे, अनिता चौगुले, आनंदी चव्हाण, निलांबरी भुईंबर, अनिता गुरख, डॉ. संतोष पेडणेकर, अनिल गायकवाड, सचिन घुगरी, सतिश हळदकर, अमित देशपांडे, सुभाष चोथे, सागर गुरव, विक्रम पवार, वामन बिलावर, बाळ पोटे-पाटील, भाऊसो मोरे, महादेव खमलेट्टी, अर्जुन सावेकर, सुधाकर गोरूले आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.



