माजी आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन
बुगडीकट्टी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन

बुगडीकट्टी : येथील विविध विकास कामांचे उदघाटन करताना माजी आमदार राजेश पाटील. यावेळी उपस्थित सरपंच दयानंद देसाई, जयसिंग चव्हाण, संतोष पाटील, जोतिबा हुबळे व इतर मान्यवर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मी माजी आमदार असलो तरी माझी नेहमी विकास कामांची दृष्टी आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील विविध प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा माझा सतत प्रयत्न असेल. गावागावातील जनतेच्या पाठबळामुळेच विधानसभेत मला प्रतिनिधित्व करता आले. येथील जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे. असे प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी बुगडीकट्टी येथील कार्यक्रमात केले.
बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या नूतन ग्रामपंचायत वास्तूचा लोकार्पण सोहळा व दहा लाख रुपये खर्चाच्या आरोग्य उपकेंद्र येथील अप्रोच रस्त्याच्या शुभारंभ व बस स्थानकाचे उदघाटन करण्यात आले. कर्नाटकातील मुक्तीमठ श्री श्री तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग चव्हाण, जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी, केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील, हलकर्णी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी निलिमा धबाले, मुन्नासो नाईकवाडे, अभय अडकुरकर, उपअभियंता राहुल माळी, शाखा अभियंता अशोक तोडकर, सिव्हिल इंजिनिअर लिंगराज देसाई, सामाजिक कार्यकर्ते दीपक पुजारी, तेरणीचे सरपंच रमेश पुजारी, माजी सरपंच करवीर उथळे, मोसीम मुल्ला आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक सरपंच दयानंद देसाई यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वामीजींनी आशीर्वाचनाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी गावच्या महालक्ष्मी यात्रेसाठी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कामाना नाईक यांनी केले. आभार मायाप्पा धनगर यांनी मानले.
या कार्यक्रमास जोतिबा हुबळे, विठ्ठल राजगोळे, रामा हुडली, एम.डी.कांबळे, रुद्राप्पा देसाई, मंगल देसाई, गौरा राजगोळे, क्षितिजा नाईक, प्रकाश नाईक, वसंत नाईक, पूजा धनगर, अनिल देसाई, आप्पासाहेब पाटील, संतोष सत्तेगिरी, ग्रामपंचायत अधिकारी सुजाता पाटील, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा, वर्कर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.





