Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

50 मीटर रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत व्यंकटराव प्रशालेचे सुयश

महमदजैद मकानदारची उत्कृष्ट कामगिरी ; वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड 




आजरा (हसन तकीलदार): नुकत्याच  मुंबई येथे पार पडलेल्या 28व्या कॅप्टन एस जे इझेकील मेमोरियल महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप नेव्हीसेस या पन्नास मीटर शूटिंग चॅम्पियनशिप  स्पर्धेमध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या महंमदजैद हसन मकानदार या विद्यार्थ्याने 524 गुण मिळवून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली.  आता वेस्ट झोन स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.

 



या यशस्वी विद्यार्थ्याला आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा श्री जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष, खजिनदार,सचिव व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री आर जी कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे शेलार, वर्गशिक्षक पी. एस. गुरव क्रीडाशिक्षक एस. एम. पाटील , एनसीसी ऑफिसर एम. एस. पाटील व विषय शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले. महंमदजैद, पालक,व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महमदजैद हा सामान्य कुटुंबात राहून सुद्धा त्याने यशाला घातलेल्या गवसणीचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक संस्थानी डिजिटल फलके लावून त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.