दुंडगे ग्रामपंचायतीच्या वतीने 'संविधान प्रास्ताविक कट्टा'चे उदघाटन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्रास्ताविकेचा विसंगत कायदा झाला तर तो रद्द होऊ शकतो असा इतिहास भारतीय संविधानाने घडवलेला आहे. उद्देशिक प्रास्ताविक हा संविधानाचा आत्मा आहे. प्रस्ताविकेच्या मूल्यांचा जागर होणे गरजेचे आहे. म्हणून जगण्याचा पाया मजबूत करूयात असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीचे नेते व संविधान प्रचारक दीपक कसाळे (पुणे) यांनी केले.
दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे सरपंच सौ. रेखा लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान प्रास्ताविकेच्या कट्टाच्या उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संविधान संवर्धन चळवळीचे मुख्य संघटक संग्राम सावंत म्हणाले, 'एक व्यक्ती एक मत एक मूल्य' हे तत्व संविधानात आहे ही एक क्रांती आहे. जगभरात महिलांना मतदानासाठी संघर्ष करावा लागला, मात्र भारतीय संविधानाने प्रत्येक महिलेला मतदानाचा अधिकार दिला. सविधान प्रस्ताविकेच्या कट्ट्याची चळवळ उभे करण्याचे कारण संविधान घराघरामध्ये पोहोचले पाहिजे आणि त्यांचे विचार जनमानसात रुजले पाहिजे हा हेतू ठेवून ही चळवळ उभी राहिली आहे. यावेळी उपसरपंच आण्णासाहेब पाटील, सदस्य प्रशांत देसाई, सामाजिक कार्यकर्ते तमांन्ना पाटील, वंचितचे अर्जुन दुंडगेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संविधान संवर्धन चळवळीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सदस्य अपराया कांबळे, ओंकार घबाडे, मलाप्पा गुलगुंजी, वंचितचे नेते अर्जुन दुंडगेकर संविधान संवर्धन चळवळीचे विनायक कांबळे राहुल दास, शिवराज कांबळे, दुंडव्वा नाईक, प्रकाश मंगदुम, अरुण लाटकर, प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, बचतगटाचे सीआरपी शोभा कांबळे, बचतगट सदस्या, आशा वर्कर व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी विकास मोटे यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य प्रशांत देसाई यांनी मानले.


